आनंदवार्ता !! २४ एप्रिल पासून लाडक्या बहिणींना एप्रिल चा हफ्ता मिळणे सुरु !

3,000 April Bonus is Coming!

मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ हळूहळू घराघरात पोचायला लागलीय. या योजनेत दर महिन्याला गरीब आणि गरजू महिलांना १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेचा दहावा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे.

3,000 April Bonus is Coming!

आता पर्यंत मिळाले १३,५०० रुपये!

जुलै ते मार्चपर्यंतच्या ९ हप्त्यांमधून प्रत्येक पात्र महिलेला १३,५०० रुपये थेट खात्यावर जमा झालेत. आता सरकार एप्रिलच्या हप्त्यासाठी तयारी करतंय. यासाठी तब्बल ३५०० कोटींचं बजेट सरकारनं मंजूर केलंय.

यावेळी ३,००० रुपये मिळणार!

ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता वेळेवर मिळाला नाही आणि मार्चमध्येसुद्धा बाकी राहिलंय, त्यांना एप्रिलमध्ये सगळे मिळून दोन हप्त्यांचे म्हणजेच ३००० रुपये मिळणार आहेत. पण त्यासाठी खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे आणि DBT चालू असणं गरजेचं आहे.

पात्र महिलांसाठीच हप्ता!

मुख्यमंत्र्यांनी नुकतीच तपासणीचे आदेश दिले आणि त्यात ५ लाखांहून अधिक अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे आता फक्त पात्र महिलांनाच दहावा हप्ता मिळणार आहे.

दहावा हप्ता कधी मिळेल?

अंदाजानुसार, २४ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत हप्त्यांचं वाटप होणार आहे. हे वाटप दोन टप्प्यांत होईल –

  • पहिला टप्पा: २४ एप्रिलपासून सुरू
  • दुसरा टप्पा: २७ एप्रिलपासून सुरू

पात्रता काय आहे?

  • महिला २१ ते ६५ वयोगटातली असावी
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी
  • घरात ४ चाकी (ट्रॅक्टर सोडून) गाडी नसावी
  • महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा कुटुंबातील एकटी अविवाहित असावी
  • अर्ज सरकारच्या पोर्टलवर मंजूर झाला पाहिजे

आपली अर्जाची स्थिती कशी तपासाल?

  •  ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन
  • अर्जदार लॉगिन करा
  • ‘Application Made Earlier’ वर क्लिक करा
  • तिथे ‘₹’ चिन्हावर क्लिक करून हप्त्याची स्थिती पाहू शकता
Leave A Reply

Your email address will not be published.