पीएमपीला तब्बल ११०० नव्या बस!-1100 New Buses for PMPML!

1100 New Buses for PMPML!

पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी! येत्या काही महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यात तब्बल ११०० नव्या बस येणार आहेत. पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी ही माहिती प्रवासी मेळाव्यात दिली. त्यातल्या ६०० बस दोन महिन्यांत पुण्याच्या रस्त्यावर धावायला लागतील, तर बाकीच्या ५०० बस पीएमआरडीएकडून येणार आहेत.

1100 New Buses for PMPML!

३०० जुन्या बस होणार स्क्रॅप!
सध्या ३०० जुन्या बस रिटायर होणार असल्या तरी त्या आधीच नवीन ६०० बस सेवा देणार असल्याने प्रवाशांना त्रास होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बसचं वेळापत्रक वाढवणार!
जशीजशी बसची संख्या वाढेल, तशा फेऱ्याही वाढवल्या जातील. त्यामुळे बस थांब्यावर तासनतास उभं राहण्याची वेळ येणार नाही.

ड्रायव्हर-वाहकांसाठी ट्रेनिंग!
चालकांना दोन दिवसांचं खास ट्रेनिंग दिलं जातंय, जेणेकरून प्रवास जास्त सुरक्षित होईल. शहरात ट्रॅफिकमध्ये तासन् तास बस चालवणं ही सोपी गोष्ट नाही, हे दीपा मॅडम म्हणाल्या.

प्रवाशांचं मत काय?
प्रवासीही आपली मतं मांडायला विसरले नाहीत. काही मुद्दे असे –

  • अधिकाऱ्यांनी स्वतः आठवड्यातून एकदा तरी बसने प्रवास करावा

  • बऱ्याच थांब्यांवर सावली नाही, उन्हात- पावसात त्रास होतो

  • काही ड्रायव्हर मोबाईलवर बोलतात – हे थांबायला हवं

  • एकदा काढलेले बसथांबे रस्त्याचं काम झाल्यावर पुन्हा लावले जात नाहीत

दरवाढ नाही पण खर्च वाढला!
दहा वर्षांपासून तिकीटाचे दर वाढले नाहीत, पण सीएनजीचे दर मात्र दुप्पट झालेत, हे दीपा मॅडम यांनी मुद्दाम सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.