सरकारी नोकरीची सुवर्ण संधी !! अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती ! त्वरित अर्ज करा
Massive Rush for Anganwadi Posts!
सिन्नर तालुक्यात पंचायत समितीमार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती निघाली हाय. एकूण ७२ जागा असताना त्यासाठी चक्क ४७३ जणींनी अर्ज भरलाय. म्हणजे स्पर्धा अगदी टोकाची हाय!
ही सरकारी नोकरी असली तरी मानधन फक्त १० हजार (सेविकेसाठी) आणि ५ हजार (मदतनीससाठी) इतकं आहे. तरीही या जागांसाठी बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., डीएड, बीएड, एमएसडब्ल्यू, कृषी डिप्लोमा, एमबीए, इंजिनीअरिंग डिप्लोमा-डिग्री अशा शिकलेल्या बहिणी रांगेत उभ्या आहेत!
गेल्या आठवड्यात पंचायत समितीत अर्ज देताना महिलांची चांगलीच गर्दी झाली होती. अर्जासाठी किमान बारावी पास, ३५ वर्षांखालील आणि त्याच गावातली असणं गरजेचं होतं. गावातच अर्धवेळ सरकारी नोकरी मिळणार म्हणून बायांनी आपापल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून घेतली.
दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशन, MSCIT – याला गुण मिळतात म्हणून अनेक बायांनी आपल्या सर्व सर्टिफिकेट्स जोडलीत. आता अर्ज छाननीनंतर गावागावची पात्र उमेदवारांची यादी लावली जाणार हाय. त्यातही शिक्षण घेतलेल्या बायांची चुरस भारी आहे.
मानधन कमी असलं तरी घराजवळ, गावातच नोकरी मिळतेय म्हटल्यावर, बेरोजगार महिलांसाठी ही मोठी संधीच समजली जातेय. त्यामुळे ही नोकरी मिळवण्यासाठी बायका पूर्ण जोर लावतायत!