सुवर्णसंधी !! LLB विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधरांसाठी इंटर्नशिप प्रोग्रॅम 2025 ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा

LLB Internship Programme 2025!

भारतीय कायदा विभागात (Department of Legal Affairs, Government of India) एलएलबी विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधरांसाठी इंटर्नशिप प्रोग्रॅम 2025 जाहीर करण्यात आला आहे. या इंटर्नशिपद्वारे कायद्याचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना कायदा विभागातील कार्यपद्धतीची ओळख करून देणे, आणि विविध क्षेत्रांतील कायदेशीर कामांची प्रत्यक्षात अनुभूती देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

LLB Internship Programme 2025!

अभ्यास आणि संदर्भ तपासणी, न्यायालयीन कार्यपद्धती, संविधानिक व प्रशासकीय कायदे, अर्थसंबंधी कायदे, कामगार कायदे, मध्यस्थी, करार कायदे आदी विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही इंटर्नशिप मुख्यतः एक महिन्यांची असते आणि ती दर महिन्याच्या पहिल्या कार्यदिनी सुरू होते. या कालावधीत विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. कोणतीही इतर नोकरी किंवा अभ्यासक्रम इंटर्नशिप दरम्यान करता येणार नाही.

या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय, लॉ स्कूल किंवा विद्यापीठातून कायद्याचा दुसरा वर्ष पूर्ण केलेले (3 वर्षीय कोर्स) किंवा तिसरे वर्ष पूर्ण केलेले (5 वर्षीय कोर्स) विद्यार्थी पात्र आहेत. तसेच, एलएलबी पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. संगणकाचे पूर्वज्ञान (MS Office, Infographics, Adobe इत्यादी) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह अपलोड करावा. कॉलेजमधील सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘No Objection Certificate’ आवश्यक आहे. तर पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांनी अंतिम वर्षाचे प्रमाणपत्र अपलोड करणे पुरेसे आहे.

या इंटर्नशिपसाठी दर महिन्याला कमाल ५० उमेदवारांना संधी दिली जाईल. निवड प्रक्रियेबाबत माहिती संबंधित विद्यार्थ्यांना ईमेल अथवा इंटर्नशिप पोर्टलद्वारे कळवण्यात येईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना दिल्लीतील मुख्य सचिवालय, सर्वोच्च न्यायालयातील सेंट्रल एजन्सी सेक्शन, दिल्ली उच्च न्यायालय, तसेच चेन्नई, मुंबई, कोलकाता व बेंगळुरू येथील शाखा कार्यालयांमध्ये नियुक्त केले जाईल. इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठी ९०% उपस्थिती अनिवार्य असून संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक अहवाल मिळणे आवश्यक आहे.

इंटर्नशिप पूर्ण केल्यावर उमेदवारांना १००० रुपये मानधनही दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. जे उमेदवार कायद्याच्या क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.