मोठी भरती!! महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा !
University Mega Recruitment – Your Chance!
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत करारपद्धतीने १७ पदे भरली जाणार असून, यामध्ये प्रशासकीय, ग्रंथालय, क्रीडा, अभियांत्रिकी आणि परीक्षा नियंत्रणाशी संबंधित पदांचा समावेश आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेसह विशिष्ट कौशल्ये आणि अनुभव आवश्यक आहे.
रिक्त पदे आणि पात्रता
ज्युनियर गार्डनर – २ पदे (८ वी उत्तीर्ण, संगणक ज्ञान आवश्यक)
ज्युनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – ५ पदे (पदवीधर, भाषा आणि संगणक कौशल्य आवश्यक)
लायब्ररी रिस्टोअरर – २ पदे (पदवीधर, ग्रंथालय क्षेत्रातील अनुभव आवश्यक)
प्लेसमेंट ऑफिसर – १ पद (MBA/LL.M, ५ वर्षांचा अनुभव आवश्यक)
असिस्टंट रजिस्ट्रार – २ पदे (पदव्युत्तर, ५ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आवश्यक)
फिजिकल एज्युकेशन कम स्पोर्ट्स ऑफिसर – १ पद (पीएचडी आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभव आवश्यक)
युनिव्हर्सिटी इंजिनिअर कम इस्टेट ऑफिसर – १ पद (सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी आणि १० वर्षांचा अनुभव आवश्यक)
डेप्युटी रजिस्ट्रार – २ पदे (पदव्युत्तर, ९ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आवश्यक)
डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन – १ पद (पदव्युत्तर, ९ वर्षांचा अनुभव आवश्यक)
डेप्युटी लायब्ररियन – १ पद (लायब्ररी सायन्स पदवी, ८ वर्षांचा अनुभव आवश्यक)
वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया
सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे असून, इच्छुक उमेदवारांनी विहित अर्ज नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह १५ एप्रिल २०२५ पूर्वी अर्ज पाठवावा. अर्ज शुल्क आणि इतर तपशील विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
मुंबई विद्यापीठात ९४ रिक्त पदांची भरती
मुंबई विद्यापीठात ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अॅप्रेंटिससाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये ९४ पदे भरली जाणार असून, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेसॉन, अकाउंट असिस्टंट, लॉ असिस्टंट, लॅब असिस्टंट यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.
रिक्त पदे आणि पात्रता
इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, प्लंबर, मेसॉन – (ITI प्रमाणपत्र आवश्यक)
फायनान्स आणि अकाउंट असिस्टंट – (B.Com, Tally आणि MS-CIT आवश्यक)
लोअर ग्रेड स्टेनोग्राफर – (पदवीधर, मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफी आवश्यक)
लॉ असिस्टंट – (कायदा विषयातील पदवी आवश्यक)
लॅब असिस्टंट – (विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक)
लायब्ररी असिस्टंट – (लायब्ररी सायन्समधील पदवी आवश्यक)
मल्टिटास्क ऑपरेटर – (कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक)
ड्रायव्हर – (पदवी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक)ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) – (संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक)
स्टायपेंड आणि अर्ज प्रक्रिया
या पदांसाठी दरमहा रु. ८,०००/- ते ९,०००/- स्टायपेंड मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी १७ एप्रिल २०२५ पर्यंत ठळर २.० पोर्टलद्वारे अर्ज करावा.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. विद्यापीठांमधील या विविध पदांसाठी अर्ज करण्याची मुदत मर्यादित आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संबंधित विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन अधिकृत सूचना व अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती घ्यावी.
तुमच्या उज्ज्वल करिअरसाठी ही संधी गमावू नका!