खुशखबर !! लाडकी बहिणींना मिळणार ३०,००० रुपये ! जाणून घ्या माहिती
Ladki Bahin Yojana Get 30,000 Loan!
महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी असलेल्या महिलांना आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. या कर्जावर १०% व्याजदर असून, परतफेड ३ वर्षांत हप्त्यांमध्ये करावी लागेल.
कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता:
- लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी असणे गरजेचे आहे.
- संबंधित महिलेचे कोल्हापूर जिल्हा बँकेत खाते असणे आवश्यक.
- कर्जासाठी दोन जामीनदार असणे बंधनकारक.
- कर्जाची परतफेड ३ वर्षांत करण्याची अट, दरमहा ९६८ रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
- कर्ज घेणाऱ्या महिलांनी त्यांचा व्यवसाय बँक खात्यातूनच करणे आवश्यक.
- लाभार्थ्यांनी आणि जामीनदारांनी बँकेचे ‘ब’ वर्ग सभासद असणे अनिवार्य.
ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरजू व कष्टकरी महिलांना मदत करण्यासाठी राबवली जात आहे. अनेक वेळा दैनंदिन गरजांसाठी महिलांना सावकार किंवा मायक्रो फायनान्सकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे महिलांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
ही सुवर्णसंधी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपयोगात आणा! अधिक माहितीसाठी कोल्हापूर जिल्हा बँकेशी संपर्क साधा.