बार्टीअंतर्गत ५ सहायक कमांडंट ची निवड ! सविस्तर वाचा
5 BARTI Assistant Commandants!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत यूपीएससी नागरी सेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणामुळे पाच विद्यार्थ्यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दल 2023 मध्ये ‘सहायक कमांडंट’ पदासाठी निवड झाली आहे.
यशस्वी उमेदवार:
- व्यंकट गायकवाड (रँक ३९
- अजित खरात (रँक २२०)
- मयूर रंगारी (रँक २४८)
- रोशन कडू (रँक २८४)
- अजय इट्खरे (रँक २९२)
मे अखेर हैदराबाद येथे त्यांचे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे (CAPF) प्रशिक्षण सुरू होणार आहे.
बार्टीची भूमिका:
बार्टी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, मासिक विद्यावेतन आणि प्रवास भत्ता देते. या मदतीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होत आहे.
विद्यार्थ्यांचे अनुभव:
रोशन कडू (अमरावती) म्हणतात, “माझे आईवडील शेतमजूर आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यास कठीण होता, पण बार्टीच्या मदतीने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.”
व्यंकट गायकवाड (लातूर) सांगतात, “वीटभट्टी कामगार कुटुंबातून आलो, हॉटेलमध्ये काम केले. दिल्लीसारख्या ठिकाणी टिकू का नाही याची भीती होती, पण बार्टीच्या प्रशिक्षणाने आत्मविश्वास दिला.”
बार्टीच्या या योजनेबाबत अधिक माहिती www.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.