आनंदाची बातमी !! शाळेतील मुलींना मिळणार दरवर्षी ४,००० रुपये मदत ! जाणून घ्या सविस्तर माहिती

4,000 Yearly Aid for Vidarbha Girls!

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरवर्षी ₹४,००० ची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ही विशेष तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

4,000 Yearly Aid for Vidarbha Girls!

मनपा शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकतात. त्यामुळे १ ली ते १२ वीच्या वर्गातील, तसेच ८०% हजेरी असलेल्या मुलींना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी २.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी इतर सुविधा:

  •  समुपदेशन केंद्र: विद्यार्थ्यांना मानसिक तणाव व नैराश्य टाळण्यासाठी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन दिलं जाणार. यासाठी ₹१ कोटींची तरतूद केली आहे.
  • बालवाडी सुरू होणार: नवीन शैक्षणिक धोरणानुसार, ३ वर्षांपासून शिक्षणाची सुरुवात केली जाणार असून, जिथे २० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तिथे प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती होईल. यासाठी ₹५५ लाख खर्च केला जाणार आहे.
  • स्पर्धा परीक्षांसाठी ‘सुपर ७५’ योजना: अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए, एनडीए अशा परीक्षांसाठी ८ वीतील ७५ गुणवंत विद्यार्थ्यांना निवडून मोफत मार्गदर्शन व शिकवणी दिली जाणार.

विदर्भातील विद्यार्थिनींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.