पंतप्रधान इंटर्नशिप योजने अंतर्गत इंटर्नशिप आणि दरमहा मिळणार ५,००० रुपये पगार !
Internship & 5,000 Stipend!
बेरोजगार सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ५०० नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार असून, उमेदवारांना दरमहा ५००० रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे. शिवाय, इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर ६ हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्चच्या आत अर्ज करावा, असं आवाहन विभागाच्या सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केलं आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचं प्रोफाइल तयार करावं. अर्जदार शेवटच्या तारखेपर्यंत तीन वेगवेगळ्या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणाची संधी मिळाल्यानंतर १२ महिने इंटर्नशिपचा कालावधी असेल आणि त्या दरम्यान प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचं संरक्षणही मिळेल.
योजनेसाठी पात्रता आणि ठळक बाबी:
- वय: २१ ते २४ वर्षांच्या तरुण-तरुणींना संधी
- प्रशिक्षण कालावधी: १२ महिने
- दरमहा आर्थिक मदत: ५००० रुपये
- पूर्णवेळ शिक्षणात असलेले किंवा सध्या नोकरी करणारे उमेदवार अपात्र
- इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर एकरकमी ६ हजार रुपये सहाय्यता
तरी, बेरोजगार आणि इच्छुक तरुणांनी संधी दवडू नका! विदर्भातल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे, त्यामुळे लवकरात लवकर pminternship.mca.gov.in वर जाऊन अर्ज करा!