सर्वात मोठी खुशखबर !! १० हजार पदांसाठी पोलिस भरती, १५ सप्टेंबरपासून तयारीला लागा!

Police Recruitment Starts from Sept 15!

राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरतीची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गृह विभागाने २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणाऱ्या १०,००० पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, सध्या तीव्र उन्हाळा आणि पावसाळ्याच्या अडचणी लक्षात घेऊन भरती गणेशोत्सवानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Police Recruitment Starts from Sept 15!

गणेशोत्सवानंतर होणार मोठी भरती!
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. मागील भरतीवेळी पावसामुळे अनेक उमेदवारांना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यंदा गणेशोत्सवानंतर मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

भरती प्रक्रियेत महत्त्वाचे बदल!
यंदाच्या भरतीसाठी १२ ते १३ लाख अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील भरतीवेळी १७,४७१ जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज आले होते, त्यामुळे याहीवेळी मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. यावेळी राज्यभर एकाच वेळी मैदानी चाचणी होणार असून, १:१० या प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील.

एका पदासाठी फक्त एक अर्ज अनिवार्य!
उमेदवारांना एका पदासाठी केवळ एक अर्जच भरता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास ते रद्द करण्यात येतील. तसेच, एका जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार जर दुसऱ्या जिल्ह्यातील चाचणीत सहभागी झाला, तर तो अपात्र ठरेल.

भरतीसाठी संभाव्य नियोजन
✔ एकूण पदे – १०,०००
✔ भरतीला सुरुवात – १५ सप्टेंबर
✔ अंदाजित अर्ज – ११ लाख
✔ भरतीसाठी कालावधी – ४ महिने

ही भरती राज्यातील हजारो तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू करावी!

Leave A Reply

Your email address will not be published.