खुशखबर !! Indian post Office मध्ये टेक्निकल सुपरवायझर पदांची भरती जाहीर ! अर्ज करण्यास उशीर करू नका
Golden Job Opportunity!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे! भारतीय डाक विभागात टेक्निकल सुपरवायझर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करावा. या भरतीसाठी १५ एप्रिल २०२५ ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे अर्ज करण्यास उशीर करू नका.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते ३० वर्षे असावे. उमेदवाराकडे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्यासोबतच ऑटोमोबाईल फर्ममध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. निवड झाल्यास ७व्या वेतन आयोगानुसार आकर्षक पगार मिळेल. उमेदवारांना ट्रेड टेस्टमध्ये सहभागी व्हावे लागेल, तसेच अर्ज स्पीड पोस्टद्वारे पाठवावा लागेल.
त्याचबरोबर, एक्झिम बँकेतही मॅनेजमेंट ट्रेनी आणि डेप्युटी मॅनेजर पदांसाठी भरती सुरू आहे. या नोकरीसाठी देखील १५ एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. वेगवेगळ्या पदांसाठी संधी उपलब्ध असून, निवड झाल्यानंतर उमेदवारांना उत्तम पगार आणि करिअर ग्रोथ मिळेल. त्यामुळे ज्या उमेदवारांना ही संधी घ्यायची आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा!