मोठी घोषणा! लाडक्या बहिणीना ST बस प्रवासावर ५०% सवलत मिळणार ! | Great News for Sisters!

Great News for Sisters!

एसटी प्रवासातील ५०% सवलत बंद होणार नाही – परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आश्वासन
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1500 देण्यात येत असले तरी, एसटी बस प्रवासावरील ५०% सवलत बंद होणार नाही, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या १८ लाख महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Great News for Sisters!

महिला प्रवाशांना तिकीट सवलत सुरूच!
राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. याशिवाय, एसटी बस तिकीटात ५०% सवलत योजनेसाठी राज्य सरकार दरमहा ₹240 कोटी अनुदान देते. काही दिवसांपासून ही सवलत बंद होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ही योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

महामंडळाच्या तिजोरीवरील भार, पण योजना कायम
राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीवर सवलतीच्या योजनांचा मोठा भार असला, तरी महिलांची सवलत कायम ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून अनुदान देण्यात काही वेळा विलंब होतो, त्यामुळे महामंडळासमोर आर्थिक अडचणी येतात. तरीही, महिला प्रवाशांसाठीची सवलत बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
दररोज एसटी प्रवासी संख्या: ५५ लाख
महिला प्रवासी संख्या: १८-२० लाख
महिन्याला तिकीट सवलत रक्कम: ₹३६० कोटी
राज्य सरकारचे अनुदान: ₹२४० कोटी

‘लाडकी बहीण’ योजनेसह एसटी प्रवासातील ५०% तिकीट सवलत योजना कायम राहील. महिलांसाठी हा दिलासादायक निर्णय असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.