लाडकी बहीण योजना – 2100 कधी मिळणार ?-Ladki Bahin Yojana When 2100?

Ladki Bahin Yojana When 2100?

लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, आम्ही दिलेलं वचन पाळू, असा मोठा दावा महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे.

Ladki Bahin Yojana When 2100?

राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. याअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. मात्र, यामुळे सरकारवर आर्थिक भार वाढत असून, इतर योजनांचा निधी वळवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने या योजनेतून महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. सत्ता मिळाल्यानंतर महिलांना या वाढीव रकमेची प्रतिक्षा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता होती, पण अद्याप निर्णय आलेला नाही.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

आम्ही दिलेलं वचन नक्कीच पाळू. 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. ही योजना सुरूच राहणार आहे, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या की, विरोधकांना ही योजना सुरुवातीपासून खुपत आहे आणि त्यांनी कधीच तिची प्रशंसा केली नाही. त्यांच्या नैराश्याचा परिणाम या योजनेवर होत आहे.

आदिती तटकरे यांनी ही माहिती अकोले, अहिल्यानगर येथे आयोजित कळसूआई महोत्सवा दरम्यान दिली. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम कधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.