मेगा भरती !! बँकेत कर्मचारी भरती सुरु ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Mass Protest for Bank Recruitment!

बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध शाखांमध्ये कर्मचारी भरले जात नसल्याने ग्राहक सेवा प्रभावित होत आहे. बँक प्रशासनाने कर्मचारी संघटनांसोबत केलेले करार पाळले जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Mass Protest for Bank Recruitment!

देशभरात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती करावी, या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्रातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. २०) तीव्र निदर्शने केली.

देशातील महत्त्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने २० मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला होता. या संपात नाशिक, जळगाव, धुळे आणि मालेगाव येथील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लिपिक, शिपाई आणि इतर सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करावी, तसेच बँक प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी असलेल्या करारांचे योग्य पालन करावे, अशा प्रमुख मागण्या या संपादरम्यान मांडण्यात आल्या.

नाशिक शहरातील बँक शाखेबाहेर संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. शेकडो कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. या निदर्शनांचे नेतृत्व संघटनेचे सरचिटणीस मनोज जाधव आणि खजिनदार मंगेश रोकडे यांनी केले. तसेच अशोक डोकफोडे, दर्शन हिरे, स्वप्नील जानेराव, संतोष बागले आणि श्रीराम बोरसे या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave A Reply

Your email address will not be published.