EPFO द्वारे खाजगी कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढणार? जाणून घ्या!

EPFO Pension Hike? Know the Update!

पेन्शन मर्यादा २५,००० रुपयांवर?
सध्या कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा १५,००० रुपये आहे. मात्र, सरकार ही मर्यादा २५,००० रुपये करण्याच्या विचारात आहे. अनेक कामगार संघटनांनी यासाठी मागणी केली असून, अर्थ मंत्रालय यावर सकारात्मक विचार करत आहे.

 EPFO Pension Hike? Know the Update!

१० वर्षे सेवा अनिवार्य
खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPFO अंतर्गत पेन्शन मिळते, मात्र त्यासाठी किमान १० वर्षे सेवा आवश्यक आहे. EPS अंतर्गत, सेवानिवृत्तीच्या वेळी पेन्शनयोग्य वेतनाचा विचार केला जातो, जो सध्या १५,००० रुपयांवर आधारित आहे.

१२,५०० रुपये महिना पेन्शन?
जर २५,००० रुपयांवर पेन्शन गणना झाली, तर ३५ वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्याला महिन्याला १२,५०० रुपये पेन्शन मिळू शकते. सध्या ही गणना १५,००० रुपयांवर आधारित असल्याने कमाल ७,५०० रुपये पेन्शन मिळते.

कंपनी किती भरते योगदान?
कर्मचाऱ्याच्या पगाराच्या १२% रक्कम पीएफ खात्यात जाते, त्यातील ८.३३% EPS मध्ये जमा होते. सध्या १५,००० रुपये वेतनावर EPS मध्ये दरमहा १,२५० रुपये जमा होतात. नवीन नियमानुसार ही रक्कम वाढू शकते.

शेवटचा निर्णय कधी?
पेन्शन वाढीचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सरकारच्या निर्णयावर लाखो कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा येईपर्यंत वाट पाहावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.