मोठी बातमी !! सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय बदलणार ? – Retirement Age Change?
Retirement Age Change?
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या मुद्द्यावर केंद्रीय कर्मचारी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत उत्तर देत सरकारकडे अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार नाही, असे स्पष्ट केले.
काय होती मागणी?
सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी केली जात होती. आठवा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर सेवानिवृत्तीच्या वयात बदल होईल, अशी चर्चा होती. मात्र, केंद्र सरकारने अशा कोणत्याही शक्यतेला पूर्णविराम दिला आहे.
सध्याची स्थिती काय?
- केंद्रीय सरकारी कर्मचारी: सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे
- 25 राज्यांतील राज्य कर्मचारी: सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे
- महाराष्ट्रातील काही राज्य कर्मचारी: सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे
सरकारने काय सांगितले?
सेवानिवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही विचार नाही.
सेवानिवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त जागांबाबत कोणतेही नवीन धोरण नाही.
राष्ट्रीय परिषदेकडूनही यासंदर्भात कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल होईल का, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सध्या तरी 60 वर्षे वयाची मर्यादा कायम राहणार आहे.