खुशखबर !! UPI चा वापर करा आणि थेट इन्सेन्टिव्ह मिळवा !

Make UPI Payments, Earn Bonus!

केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारांना चालना देण्यासाठी नवीन प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ₹2,000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर लहान दुकानदारांना थेट इन्सेन्टिव्ह मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीसाठी ही योजना लागू असेल. सरकार यासाठी तब्बल ₹1,500 कोटींचा निधी खर्च करणार आहे.

Make UPI Payments, Earn Bonus!

लहान दुकानदारांसाठी सुवर्णसंधी
ही योजना विशेषतः छोटे व्यापारी आणि दुकानदार यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ₹2,000 पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी दुकानदारांना प्रत्येक व्यवहारावर 0.15% प्रोत्साहन रक्कम मिळेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने ₹1,000 चं पेमेंट यूपीआयद्वारे केलं, तर दुकानदाराला ₹1.5 चं अतिरिक्त प्रोत्साहन मिळेल.

बँकांनाही प्रोत्साहन निधी
दुकानदारांसोबतच बँकांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. बँकांना त्यांच्याकडून दावा केलेल्या रकमेच्या 80% निधीची त्वरित भरपाई केली जाईल. मात्र, उर्वरित 20% रक्कम मिळवण्यासाठी बँकेची तांत्रिक अडचणीची मर्यादा 0.75% पेक्षा कमी असावी. म्हणजेच, बँकांनी त्यांच्या डिजिटल प्रणालीमध्ये सुधारणा करून ती अधिक विश्वासार्ह ठेवावी लागेल.

सरकारचे उद्दिष्ट – डिजिटल व्यवहारांना गती
यूपीआय व्यवहार अधिक सोपे, वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या योजनेमुळे यूपीआय व्यवहारांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पेमेंट करता यावं आणि व्यापाऱ्यांना झटपट व्यवहार करता यावेत, हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे.

झटपट व्यवहार – अधिक फायदा
यूपीआय व्यवहार पूर्णतः मोफत, सोपे आणि जलद व्हावेत यासाठी सरकारने कोणताही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांची प्रणाली आणि यूपीआय सेवा नेहमी सुरळीत राहावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे लहान दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी ही योजना मोठी कमाईची संधी ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.