नोकरीची सुवर्ण संधी!! गोव्यात भारतीय टपाल खात्यात 407 डाक सेवक पदांची भरती सुरू! त्वरित अर्ज करा
Recruitment for 407 GDS Posts!
भारतीय टपाल खात्यात ग्रामीण डाक सेवकांच्या 21,413 जागा रिकाम्या आहेत. त्यातली गोव्यातली 73 पदं भरायला घेतायत. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री डॉ. प्रम्मासानी चंद्रशेखर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही खबर दिली.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यावर अतारांकित प्रश्न विचारला होता.
चंद्रशेखर यांच्या उत्तरानुसार, गोव्यासाठी 407 ग्रामीण डाक सेवक पदं मंजूर झालीत. त्यात उत्तर गोव्यात 230, तर दक्षिण गोव्यात 177 पदं आहेत. सध्या उत्तर गोव्यात 35 आणि दक्षिणेत 38 पदं रिकामी आहेत.
ग्रामीण डाक सेवकांच्या दीर्घ गैरहजेरीबद्दल नियम:
- डाक सेवक जर 45 दिवसांपेक्षा जास्त रजेवर असेल, तर त्या जागी दुसऱ्याची नेमणूक करतात.
- सध्या टपाल खात्यात 36 बदली उमेदवार काम करतायत.
- ग्रामीण डाक सेवकांची भरती वेगवेगळ्या प्रक्रियेनं केली जाते.
21,413 पदांसाठी ऑनलाईन भरती सुरू आहे.
संविधानाच्या कलम 16(2) प्रमाणे जात, धर्म, पंथ, लिंग किंवा प्रदेश यावरून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही.
नोकरी मिळवायची असेल तर आता संधी सोडू नका, लवकर अर्ज करा!