संधी च सोन करा !! आता प्रत्येक जिल्ह्यात दर 3 महिन्याला रोजगार मेळावा! त्वरित संपर्क करा
District Job Fair Every 3 Months!
राज्यातील दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी तसेच आयटीआय आणि विविध कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांसाठी सरकारी पातळीवर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक तीन महिन्याला जिल्ह्याच्या ठिकाणी हा मेळावा होणार असून, यातून हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित या मेळाव्यात स्थानिक तसेच विविध जिल्ह्यांतील खाजगी उद्योजक आणि कंपन्या मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे केवळ सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून न राहता, खाजगी क्षेत्रातही उत्तम संधी निर्माण होत आहेत. सुरुवातीला पगार कमी असला तरी कौशल्य आणि अनुभव वाढताच वेतनात वाढ होणार आहे.
विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधीसाठी फक्त पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता विविध कौशल्यपूर्ण कोर्सेस शिकणे गरजेचे आहे. प्रात्यक्षिक ज्ञान असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी बायोडेटा, शैक्षणिक व व्यक्तिगत कागदपत्रांच्या तीन झेरॉक्स प्रतींसह मेळाव्यात सहभागी व्हावे.
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, ITI वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिन ऑपरेटर, डिप्लोमा, बी.ए., बी.कॉम., एम.कॉम., ऑफिस असिस्टंट आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यातून करिअरचा नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करून नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा.
सोलापूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे भेट द्या किंवा 0217-2992956 या क्रमांकावर संपर्क साधा.