खुशखबर!! 28 मार्चला भव्य रोजगार मेळावा आयोजित ! या संधीचा लाभ घ्या
Mega Job Fair on March 28 !
खनिज संपत्तीने समृद्ध आणि स्टील निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशन तर्फे 28 मार्च रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील 40 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्तीपत्र प्रदान केले जाईल.
कोण सहभागी होऊ शकतात?
- गडचिरोलीसह वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतात.
- सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
- नोंदणीसाठी वेबसाईट: abhijitwanjari.com
- नोंदणी केलेले उमेदवार 28 मार्चला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
रोजगार मेळाव्याची प्रक्रिया:
- नोंदणीनंतर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार टोकण दिले जाईल.
- टोकण क्रमांकानुसार ठरलेल्या विभागात थेट मुलाखत घेतली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्तीपत्र दिले जाईल.
या भव्य रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.