आधार-वोटर आयडी लिंकिंग स्पष्टता!-Aadhaar-Voter ID Linking Update!

Aadhaar-Voter ID Linking Update!

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यांची जोडणी सध्याच्या कायद्यांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांप्रमाणेच केली जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासाठी ‘यूआयडीएआय’ आणि तज्ज्ञांसोबत लवकरच तांत्रिक चर्चा सुरू होणार आहे.

Aadhaar-Voter ID Linking Update!

मंगळवारी या विषयावर आयोगाने गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय आणि ‘यूआयडीएआय’च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. निवडणूक आयोगाने सांगितले की, भारतीय नागरिकांनाच मतदानाचा हक्क असून आधार केवळ ओळख पटवण्यासाठी वापरला जातो.

आयोगाच्या निवेदनानुसार, आधार-वोटर आयडी लिंकिंग प्रक्रिया ऐच्छिक आहे आणि यासाठी कोणतेही बंधनकारक लक्ष्य किंवा वेळापत्रक नाही. जे नागरिक आधार लिंक करणार नाहीत, त्यांची नावे मतदारयादीतून वगळली जाणार नाहीत. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५०च्या सुधारित तरतुदींनुसार निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्यासाठी आधार माहिती मागण्याचा अधिकार आहे, मात्र आधार तपशील देणे बंधनकारक नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.