खुशखबर !! MPSC राज्यसेवा 2025 अखेर जाहिरात आली;एकूण ३८५ पदे ! लगेच अर्ज करा
MPSC 2025: Advertisement Released!
राज्यभरातील उमेदवारांना मोठा दिलासा!
राज्यसेवा परीक्षेची प्रतिक्षा संपली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अखेर नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यंदा एकूण 385 पदांसाठी ही भरती होणार असून, परीक्षा येत्या 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यभरातील 37 केंद्रांवर घेतली जाणार आहे.
राज्यसेवा परीक्षेतील मोठा बदल!
एमपीएससीने यंदापासून मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी नवीन पद्धतीनुसार अभ्यासाला सुरुवात केली होती. मात्र, जाहिरात विलंबाने आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चिंता होती. अखेर आयोगाने जाहीर केलेल्या 385 जागांसाठी अर्ज प्रक्रिया 28 मार्च ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत पार पडणार आहे.
विभागनिहाय पदसंख्या:
- सामान्य प्रशासन विभाग: 127
- महसूल व वन विभाग: 144
- सार्वजनिक बांधकाम विभाग: 114
नॉन-क्रिमीलेयर अर्जदारांना दिलासा!
एमपीएससीच्या अंदाजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. उमेदवारांना नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करावे लागते, ज्याची मुदत 31 मार्च 2025 ला संपणार होती. त्यामुळे उमेदवारांच्या मागणीनुसार आयोगाने वेळेत जाहिरात प्रसिद्ध केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आता पुढील तयारीला वेग!
राज्यसेवा परीक्षा 2025 ची जाहिरात जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींनी तयारीला वेग दिला आहे. आता उमेदवारांसाठी पुढील टप्पा म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास व योग्य रणनीती आखणे!