आनंदवार्ता !! सरकारच्या ‘या’ योंजनेअंतर्गत 92 हजार लोकांना थेट रोजगार मिळणार ! चला तर मग या संधीचा लाभ घ्या
92,000 Jobs! Big Opportunity !
देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. PLI (Production Linked Incentive) योजनेनंतर आता सरकारने इलेक्ट्रॉनिक घटक प्रोत्साहन योजनेला अंतिम रूप दिले आहे. या योजनेअंतर्गत पुढील 6 वर्षांत तब्बल 23,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, यामुळे 92,000 हून अधिक लोकांना थेट रोजगार मिळणार आहे.
सरकारची मोठी गुंतवणूक, इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला मिळणार बळ
भारतातील इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे. मात्र, त्याचा संपूर्ण फायदा देशातील रोजगार आणि स्थानिक उत्पादन क्षेत्राला मिळावा म्हणून सरकारने ही योजना आणली आहे. यामध्ये डिस्प्ले मॉड्यूल, कॅमेरा मॉड्यूल, प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली (PCBA), लिथियम सेल एन्क्लोजर, रेसिस्टर, कॅपेसिटर आणि फेराइट्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे.
PLI योजनेनंतर ही मोठी योजना का?
PLI योजनेच्या यशानंतर सरकार आता स्थानीय उत्पादन आणि मूल्यवर्धन वाढवण्यावर भर देत आहे. सध्या Apple आणि Samsung सारख्या मोठ्या टेक कंपन्या भारतात उत्पादन करत असल्या तरी त्यांचे स्थानिक मूल्यवर्धन केवळ 15-20% आहे. सरकारचे उद्दिष्ट ते 30-40% पर्यंत नेण्याचे आहे, जेणेकरून देशांतर्गत उद्योगांना फायदा मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल.
तीन प्रकारे मिळणार प्रोत्साहन
या योजनेतून उत्पादन आणि रोजगार वाढीस चालना देण्यासाठी सरकारने तीन प्रकारे प्रोत्साहन योजना आखली आहे –
- ऑपरेशनल खर्चावर आधारित प्रोत्साहन – उत्पादनाच्या वाढीवर आधारित सबसिडी.
- भांडवली खर्चावर आधारित प्रोत्साहन – उद्योगांसाठी मोठ्या गुंतवणुकीसाठी मदत.
- संयुक्त प्रोत्साहन योजना – दोन्ही प्रकारच्या प्रोत्साहनांचा समावेश असलेली विशेष योजना.
92,000 नोकऱ्यांसाठी तयारी कशी करावी?
सरकारची ही योजना लागू होत असताना, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, ऑटोमेशन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी इच्छुकांनी तांत्रिक शिक्षण घेऊन आणि कौशल्य वाढवून आपली संधी मजबूत करावी.
देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना!
या योजनेमुळे केवळ नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत, तर देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र मजबूत होईल आणि त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होईल. त्यामुळे PLI योजनेनंतर ही योजना भारताच्या आर्थिक विकासाला गती देणारी ठरणार आहे.
तरुणांसाठी सुवर्णसंधी! जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही योजना तुमच्यासाठी एक मोठा संधीचा दरवाजा उघडू शकते!