नवीन अपडेट !! लाडकी बहीण योजना बंद होणार नाही! – Ladki Bahin Yojana Was not Stop!

Ladki Bahin Yojana Was not Stop!

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट त्यात काही सुधारणा करण्यात येणार आहेत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना “लाडकी बहीण आमची झाली आहे, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात,” असे त्यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana Was not Stop!

महिलांसाठी कर्जयोजना सुरू होणार?

  • महिलांना मिळणाऱ्या ₹1500 थेट आर्थिक मदतीसोबतच त्यांना १० ते २५ हजारांचे कर्ज देण्याची योजना आखली जात आहे.
  • मुंबई बँक, जिल्हा सहकारी बँका आणि महिला आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • या योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम

  • लाडकी बहीण योजनेंतर्गत दरवर्षी ४५ हजार कोटी रुपये महिलांच्या हाती जातील, ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वावलंबन वाढेल.
  • कृषी क्षेत्राचा विकास दर 3.3% वरून 8.7% पर्यंत वाढला, यासोबतच AI तंत्रज्ञान, जलयुक्त शिवार, सिंचन प्रकल्प आणि कृषी विकासासाठी मोठ्या योजना राबविल्या जात आहेत.
  • शेतकऱ्यांसाठी 500 कोटींचा निधी पीक नियोजन आणि उत्पादनवाढीसाठी AI तंत्रज्ञानावर खर्च केला जाणार आहे.

लाडकी बहीण योजना केवळ मदतीपुरती मर्यादित न राहता महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.