नवीन जाहिरात!! पदवीधरांसाठी नोकरीची संधी चालून आली Mahapareshan येथे ; एकूण पदभरती २६० ! चला तर मग करा अर्ज
Job Opportunity in Mahapareshan! Hiring 260 Posts!!
तरुणांसाठी महापारेषण द्वारे नोकरीची संधी चालून आलेली आहे . एकूण २६० पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (Mahapareshan) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ एप्रिल २०२५ आहे. राज्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे.
महापारेषण अंतर्गत २६० रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी या परिमंडल कार्यालयांतर्गत पदे भरली जाणार आहेत.
भरतीसाठी पात्रता आणि अटी:
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे बी.कॉम. पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी कोणताही अनुभव आवश्यक नाही. वयोमर्यादेबाबत सर्वसाधारण उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्षे निश्चित करण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येईल. माजी सैनिक उमेदवारांना सैनिकी सेवेकाळासोबत अतिरिक्त ३ वर्षे सवलत दिली जाईल, तर दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे.
भरती परीक्षेसाठी १५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असून, ही परीक्षा राज्यभर विविध केंद्रांवर आयोजित केली जाईल. अर्ज प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹६००, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना ₹३०० अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला mahatransco.in भेट द्या. सरकारी नोकरीच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्या!