नवीन मोठी बातमी !! सरकारला ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा आर्थिक फटका!

'Ladki Bahin' Scheme Impact! Budget Cut!

राज्य सरकारने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी ८१३ कोटी निधी मंजूर केला होता, ज्यातील ८०% निधी आधीच खर्च झाला आहे. मात्र, पुढील आर्थिक वर्षासाठी जिल्हा प्रशासनाने ३५० कोटींच्या वाढीव निधीची मागणी केली असताना केवळ ७० कोटींचाच निधी मिळणार आहे.

'Ladki Bahin' Scheme Impact! Budget Cut!

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. परिणामी, जिल्हा वार्षिक योजनेतील निधीला मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यात आली आहे.

विशेषतः २०२६-२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने वाढीव निधीची मागणी केली होती. मात्र, सरकारने संपूर्ण निधी देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

वाढीव निधीसाठी जिल्हा प्रशासनाची मागणी
नाशिकसाठी ६९१ कोटींची मर्यादा जाहीर
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ३५० कोटींच्या वाढीव निधीची मागणी
मात्र, सरकारकडून केवळ ७० कोटींची मंजुरी

राज्यातील आर्थिक नियोजन आणि निधी वितरणावर ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट होत असून, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रकल्पांना अपेक्षित निधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.