आनंदाची बातमी !! लवकरच महाराष्ट्रात मेगा प्राध्यापक भरती! | Mega Assistant Professor Recruitment Soon!

Mega Assistant Professor Recruitment Soon!

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाने या प्रस्तावावरील काही त्रुटी दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या असून त्या लवकरच पूर्ण करून भरती प्रक्रियेला वेग दिला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेत दिली.

Mega Assistant Professor Recruitment Soon!

राज्यातील प्राध्यापक भरतीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्यातील ४,४३५ रिक्त सहायक प्राध्यापक पदे भरण्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच आवश्यक कार्यवाही पूर्ण करून भरतीला गती देण्यात येणार आहे.

राज्यातील ११ सार्वजनिक विद्यापीठे आणि १,१७२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये ३६,७६३ मंजूर पदांपैकी १२,५२७ सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘NEP’ ची अंमलबजावणी आणि ‘NAAC’ मानांकनासाठी १००% पदभरती आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर रिक्त जागांमुळे महाविद्यालयांना अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

सध्या राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये जवळपास ४०% पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेट, नेट आणि पीएचडी धारक बेरोजगार राहिले आहेत. या भरतीला गती देण्यासाठी आणि रिक्त पदे किती कालावधीत भरली जातील, याबाबत पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, प्राध्यापक भरती संदर्भात शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. वित्त विभागाकडून आलेल्या त्रुटी लवकरच दूर करण्यात येणार असून भरती प्रक्रिया लवकरच सुरळीत राबवली जाईल. या चर्चेत जयंत आसगावकर, सत्यजित तांबे, विक्रम काळे आणि अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला. भरतीला वेग मिळाल्यास अनेक प्राध्यापक व विद्यार्थी यांना दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.