महत्वाचे !! गोवा सरकारी आयोगाच्या नोकर भरती परीक्षेत मराठी भाषेला स्थान अशी मागणी !
Goa Jobs: Give Marathi a Place!
गोवा सरकारी आयोगाच्या नोकर भरती परीक्षेत मराठी भाषेला स्थान द्यावे आणि सरकारी कार्यालयांमध्ये फलक मराठीत असावेत, अशी मागणी सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात राज्य भाषा संचालनालयाचे संचालक प्रशांत शिरोडकर यांना पणजी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
वाहतूक पोलिसांची कारवाई
फोंडा वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली आवाज वाढवून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तीन दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी
सीसीए पणजी रुग्णवाहिका पथकाने तातडीने कृती करून १.३ वर्षांच्या चिमुकलीचे हृदयविकाराच्या झटक्यातून प्राण वाचवले. ईएमटी-ए वैभवी वेरेंकर आणि पायलट अब्दुल शेख यांनी इंट्यूबेशन आणि व्हेंटिलेटर सपोर्ट दिला, ज्यामुळे बाळाला गोमेकॉ हॉस्पिटल (GMC) येथे सुरक्षितरित्या हलवण्यात आले.
जुने गोवे पोलिसांची तपासणी आणि अटक
जुने गोवे पोलिसांनी करमाळी आणि परिसरातील ५१२ भाडेकरूंची तपासणी केली. यामध्ये संशयित आढळलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बेकायदेशीर घरे हटवण्याची तयारी
उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासनाने थिवी येथील ‘लाला की बस्ती’ मधील बेकायदेशीर घरे हटवण्यासाठी ११ मार्च २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यानंतर कोणत्याही दिवशी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होईल. २५ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.