इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) मार्फत एग्रीकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी (AGT) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार १५ मार्च २०२५ पर्यंत agt.iffco.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती निशुल्क आहे, त्यामुळे अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पात्रता:
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एग्रीकल्चरमध्ये B.Sc. (60% गुणांसह) पूर्ण केलेले असावे.
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी किमान 55% गुणांची आवश्यकता आहे.
अर्जदाराचे वय १ मार्च २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे (नियमानुसार वयाची सूट लागू).
अर्ज प्रक्रिया:
agt.iffco.in वेबसाइटला भेट द्या आणि नोंदणी करा.
“Click Here to Register” बटणावर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
नोंदणी पूर्ण झाल्यावर “Click Here to Login” वर क्लिक करून अर्ज भरा.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची कंप्युटर आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा देशभरातील प्रमुख शहरांमध्ये (अहमदाबाद, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, चेन्नई इ.) होणार आहे. त्यानंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल.
वेतन:
प्रशिक्षण कालावधी १ वर्ष असून, या कालावधीत ₹33,000/- मासिक वेतन मिळेल.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर वेतन ₹37,000/- मासिक केले जाईल.
B a graduate sathi kahi jaga ahet ka