खुशखबर !! आता नागपुरात संत्रा प्रक्रिया हब; शेतकऱ्यांना दिलासा ! – Orange Processing Hub, Nagpur!
Orange Processing Hub, Nagpur!
नागपुरातील नवीन पतंजली फूड अँड हर्बल पार्कमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. या भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मिहान, नागपूर येथे नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते.
संत्रा उत्पादकांसाठी वरदान
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे मोठा फायदा होईल. फळांच्या उत्पादनात आणि दर्जात सुधारणा होईल, तसेच बाजारात चांगला दर मिळेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे पार्क संत्रा उत्पादकांसाठी वरदान ठरेल. येथे फळांची वर्गवारी, प्रतवारी, साठवणूक आणि संपूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे.
पतंजली फूड्सचा विक्रमी नफा
बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स कंपनीने विक्रमी कमाई नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पतंजली फूड्सचा निव्वळ नफा 71.29% वाढून 370.93 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा 216.54 कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 9,103.13 कोटी रुपयांवर पोहोचले असून मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.