सरकारी नोकरीची संधी!! बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर पदाच्या १५९ रिक्त जागा भरल्या जाणार आहे ! लवकरात लवकर अर्ज करा
Bank of India Recruitment!
मित्रांनो, नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे . BOI मध्ये एकूण १५९ पदांची भरती ८ मार्च २०२५ पासून सुरु झालेली आहे . अंतिम तारीख २३ मार्च २०२५ आहे . अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज प्रक्रिया ८ मार्च २०२५ पासून सुरू झाली असून अंतिम तारीख २३ मार्च २०२५ आहे.
या भरतीअंतर्गत चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी एकूण १५९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. चीफ मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा २८ ते ४५ वर्षे, सीनियर मॅनेजरसाठी २८ ते ४० वर्षे, तर मॅनेजरसाठी २५ ते ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी फी सामान्य प्रवर्गासाठी ₹८५० आणि राखीव प्रवर्गासाठी ₹१७५ इतकी आहे, जी ऑनलाइन भरावी लागेल.
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा किंवा मुलाखतीच्या आधारावर केली जाईल. परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत देण्याचा पर्याय असेल. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.