उत्तमसंधी!! आश्रमशाळांमध्ये एकूण १,४९७ शिक्षक पद भरती; चला तर मग जाणून घेऊया निवड प्रक्रिया !

Teacher Recruitment in Ashram Schools on the Lines of 'Samagra Shiksha!!

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘समग्र शिक्षा’च्या धर्तीवर संगणक, क्रीडा आणि कला विषयासाठी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. एकूण १,४९७ शिक्षकांची पदे निविदा प्रक्रियेद्वारे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Teacher Recruitment in Ashram Schools on the Lines of 'Samagra Shiksha!!

भरती आदेश जारी
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. ४९९ शासकीय आश्रमशाळांसाठी ४९९ कला शिक्षक, ४९९ क्रीडा शिक्षक आणि ४९९ संगणक शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरतीसाठी जीईएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, यासाठी ८१ कोटी ८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कंत्राटी भरतीला पर्याय
२०१८-१९ पासून क्रीडा, संगणक आणि कला शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या भरतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ११ महिन्यांच्या करारावर शिक्षक नेमले जात होते. मात्र, राज्यातील सर्वच आश्रमशाळांमध्ये ही भरती पूर्ण झालेली नव्हती.

कायम सेवेसाठी न्यायालयात धाव
ज्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात आली होती, तेथील काही शिक्षकांनी सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी या पदांची भरती आता बाह्य स्रोताद्वारे केली जाणार आहे.

शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया
१६ नोव्हेंबर २०२२ रोजी आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय काढून क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित केला आहे. त्यानुसार, आगामी शैक्षणिक वर्षात ही भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.