आनंदाची बातमी !! नागपुरात पतंजलीचां मेगा फूड पार्क; 10,000 हून अधिक रोजगार निर्मिती ! – Patanjali Food Park in Nagpur !

Patanjali Food Park in Nagpur !

नागपुरात पतंजलीचा मेगा फूड अँड हर्बल पार्क उभारला जात आहे, ज्यामध्ये 700 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली असून, हा प्रकल्प 10,000 हून अधिक रोजगार निर्मिती करणार आहे. या प्रकल्पात दररोज शेकडो टन फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया केली जाणार आहे. विशेषतः नागपूरच्या संत्र्यांवर प्रक्रिया करून फ्रोझन ज्यूस कॉन्सन्ट्रेट तयार केले जाणार आहे, जो पूर्णतः नैसर्गिक असून कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह किंवा साखर त्यात वापरण्यात येणार नाही.

Patanjali Food Park in Nagpur !

प्रक्रिया आणि उत्पादन
या प्रकल्पात आवळा, आंबा, पेरू, पपई, सफरचंद, डाळिंब, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, भोपळा, कारले आणि गाजर यांसारख्या फळे व भाज्यांवर प्रक्रिया करून जागतिक दर्जाच्या पेस्ट आणि प्युरी तयार केल्या जातील. या प्रक्रियेसाठी टेट्रा पॅक युनिट उभारले जात आहे. याशिवाय, संत्र्याच्या सालीपासून कोल्ड प्रेस ऑइल, ऑरेंज बर्फीचा प्रीमियम लगदा, तसेच तेल व पाणी आधारित सुगंध अर्क तयार करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांना थेट फायदा
पतंजली हा कारखाना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. कंपनी थेट शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदी करणार असून मध्यस्थांची गरज राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सेवा, सेंद्रिय खत, आणि नमुना रोपवाटिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गुंतवणूक आणि भविष्यातील विस्तार
आतापर्यंत या प्रकल्पात 700 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि एकूण 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. मार्च 2025 मध्ये मिहान, नागपूर येथे हा प्रकल्प सुरू होणार असून, भविष्यात 1,000 कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. सुमारे 10,000 युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, हा प्रकल्प नागपूर आणि विदर्भातील औद्योगिक विकासासाठी मोठी संधी ठरणार आहे.

1 Comment
  1. Shaikh Mustafa Sadik says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.