यंदाच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल होणार परीक्षार्थीच्या चेहऱ्याची पडताळणी !!
Facial Verification Mandatory for Exam Candidates!!
सीईटी परीक्षेच्या सुरक्षेसाठी यंदाही QR कोड प्रणाली कायम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, परीक्षा घेतल्या जाणाऱ्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, जे परीक्षेदरम्यानच्या सर्व हालचालींची नोंद ठेवतील.
बॉडी कॅमेराद्वारे थेट निरीक्षण
पर्यवेक्षकांनाही बॉडी कॅमेरे दिले जातील, जे त्यांच्या कपड्यांच्या पुढील भागावर बसवले जातील. या कॅमेर्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांवर सतत नजर ठेवता येईल, तसेच कोणतेही गैरप्रकार टाळणे शक्य होईल, अशी माहिती सीईटी कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.
फेशिअल रेकग्निशन अनिवार्य
यंदाच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची चेहरा पडताळणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर फेशिअल रेकग्निशन प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना जावे लागेल. अर्ज करताना दिलेला फोटो आणि प्रत्यक्ष चेहरा ८०% जुळणे अनिवार्य असेल. जुळल्यासच परीक्षा देता येईल.
हा फेशिअल रेकग्निशन अहवाल जतन केला जाणार असून, सामायिक प्रवेश प्रक्रियेत तो पुनरावलोकन केला जाईल. विद्यार्थ्याने प्रवेशासाठी सादर केलेला फोटो, अर्जावर दिलेला फोटो आणि परीक्षेतील चेहरा पडताळणीतील फोटो यांची तुलना केली जाणार आहे.
तंत्रज्ञानाचा वाढता वापर
या आधुनिक प्रणालीमुळे बनावट परीक्षार्थींना रोखता येणार आहे, तसेच परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. भविष्यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणखी समावेश करून गैरप्रकार रोखण्याचा विचार केला जाईल, असे सीईटी कक्षातील सूत्रांनी सांगितले.