सोलापूर जिल्ह्यात मोठा Economic सर्व्हे!

Economic Census 2025 Major Survey in Solapur District!

संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक घरातल्या माणसाचं उत्पन्नाचं मुख्य साधन कोणतं आहे, तो कुठला उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करतो, याची माहिती गोळा करण्यासाठी एप्रिल महिन्यात आर्थिक गणना होणार आहे. ह्या गणनेसाठी अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका मदतीला असतील, आणि साधारण दोन ते अडीच महिने हा सर्व्हे चालेल.

Economic Census 2025 Major Survey in Solapur District!

दर दहा वर्षांनी लोकसंख्येची जनगणना केली जाते, पण २०११ नंतर अजूनही जनगणना झालेली नाही. त्यामुळे गेल्या १४ वर्षांत देशाची आणि राज्याची लोकसंख्या किती वाढली, याचा ठोस आकडा उपलब्ध नाही. याआधी, प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील १० लाख कुटुंबांचा सर्व्हे होणार असून यातून किती लोक नोकरी किंवा व्यवसाय करतात, किती लोक शिक्षण घेत आहेत, आणि किती लोक कोणतंच काम करत नाहीत, याचा अंदाज मिळेल. या सर्व्हेसाठी कर्मचारी अपुरे पडल्यास शिक्षक संघटनांशी चर्चा करून मदत घेण्याचा विचार सुरू आहे. केंद्र सरकारने या संदर्भात राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला असून सर्व्हे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल.

एप्रिल ते जूनदरम्यान होणारा सर्व्हे

प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार असून त्यांना प्रत्येकी ३०० कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल. शाळांना सुट्टी लागल्यावर म्हणजेच एप्रिल ते जून या काळात ही गणना पूर्ण केली जाणार आहे. या सर्व्हेमुळे कोणत्या वयोगटातील तरुण-तरुणी रोजगार, व्यवसाय किंवा नोकरी करतात किंवा करत नाहीत, हे स्पष्ट होईल. त्यामुळे शासनस्तरावर गरजेनुसार उपाययोजना ठरवता येतील.

गट करून कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी

सोलापूर जिल्ह्यात १० लाख कुटुंबांची आर्थिक गणना होणार असून त्याचं नियोजन सुरू आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती नेमकं कोणतं काम करतो आणि त्याच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन काय आहे, याचा सर्व्हे एप्रिलपासून सुरू होईल. हा सर्व्हे अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांच्या मदतीने केला जाणार आहे.

  • दिनकर बंडगर, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सोलापूर

आर्थिक गणनेची माहिती

  • एकूण कुटुंबे: १० लाख
  • सर्व्हेसाठी एकूण कर्मचारी: ७०००
  • प्रत्येक कर्मचाऱ्यास उद्दिष्ट: ३०० कुटुंबे
  • सर्व्हे कालावधी: २ ते अडीच महिने
Leave A Reply

Your email address will not be published.