सुवर्ण संधी !! जलसंपदा विभागात निघाली मोठी भरती,दरमहा १ लाखाच्या वर वेतन ! चुकवू नका नोकरीची ही संधी

WRD Recruitment – Great Opportunity with Attractive Salary!

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे .राज्यातील जलसंपदा विभागात, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाईन पध्दतीने १७ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करावा .मुंबई हे या नोकरीचे ठिकाण असणार आहे. या पदासाठी उमेदवारांना दरमहा 1,82,000 रुपये वेतन मिळणार असून, अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी वाया जाऊ देऊ नये.

WRD Recruitment – Great Opportunity with Attractive Salary!

ही भरती विधी सदस्य या पदासाठी होत असून, एलएलबी किंवा कायदेशीर पदवी असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. उमेदवारांकडे पदवीनंतर कायदेशीर प्रक्रिया किंवा वकिलीचा अनुभव असल्यास त्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे 67 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांनाही अर्ज करता येईल, त्यामुळे अनुभवी उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे, तर 17 मार्च 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. या पदभरतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अर्ज करता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी psecwr.wrd@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पाठवावा. ऑफलाईन अर्जासाठी, जलसंपदा विभागाच्या जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवता येईल. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी, अन्यथा अर्ज अपूर्ण मानला जाऊ शकतो.

स्पर्धात्मक युगात चांगल्या संधी सहज मिळत नाहीत, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी साधावी आणि अर्ज करण्यास विलंब करू नये. जर तुम्ही पात्र असाल आणि अभ्यास उत्तम असेल, तर तुम्ही या भरतीसाठी निवडले जाऊ शकता.

3 Comments
  1. Rohit Nagnath Gaikwad says

    Msc chemistry जागा नाहीत का

  2. Prashant watane says

    कागज पत्ते काय पाहिजे पेपर कधी होणार ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार
    मी ex-servicemen चा किती जागा आहे आहे मला कृपया पुर्ण माहीत

  3. rahul abhale says

    krupaya mala advertise pathva

Leave A Reply

Your email address will not be published.