RTE Admission साठी मुदतवाढ, १० मार्च पर्यंत घेता येणार प्रवेश !

Education Department Extends Deadline for RTE Admissions!!

शिक्षण विभागाने आरटीई (RTE) प्रवेश प्रक्रियेसाठी 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे काही कारणास्तव प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ, शालेय शिक्षण विभागाच्या आरटीई 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Education Department Extends Deadline for RTE Admissions!!

आरटीई अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली होती, त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एसएमएस पाठविण्यात आले. यापूर्वी 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख होती, मात्र अद्याप अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

46 हजार 360 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
राज्यातील 8,863 शाळांमधील 1,09,087 जागांसाठी आरटीई प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी राज्यभरातून 3,05,152 विद्यार्थ्यांनी अर्ज केले, त्यापैकी 1,01,967 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. मात्र, आतापर्यंत फक्त 46,360 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला.

उर्वरित विद्यार्थ्यांसाठी संधी
उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि सर्व पात्र विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षणाची संधी मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.