खुशखबर !! लाडकी बहिण योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री यांची ग्वाही!!
Ladki Bahin Yojana Will Not Be Stopped – Deputy CM Assures!!
आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हटल्यावर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठ्या दिलासाची गोष्ट आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
ठाणे महापालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील पात्र महिलांना लाभ मिळत राहील आणि कोणीही त्यांच्या हक्कावर गदा आणू शकत नाही.
जनतेसाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय
शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. अडीच वर्षे अविरत मेहनत घेतली आणि माझ्या लाडक्या बहिणी व भावांमुळे मला ऊर्जा मिळत राहिली. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकहिताचे निर्णय घेतले गेले नव्हते.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मी सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले. या राज्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझ्यासाठी सर्वात मोठी ओळख आहे.”
गरीब आणि सामान्य जनतेसाठी प्रयत्न
गरीबीची जाणीव असल्यामुळे गरिबांना मदत व्हावी, या उद्देशाने विविध योजना सुरू केल्याचेही शिंदे यांनी सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी काही लोक गरिबी हटाव असे म्हणायचे, पण प्रत्यक्षात गरिबी नष्ट झाली नाही, तर गरीबच हटले,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध
महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क असून, अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल. “हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेऊन नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कोणीही आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करण्याची हिंमत करू नये,” असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले.