शिक्षक शिक्षण नियमांत मोठे बदल!

Major Changes in Teacher Education Rules!

केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) नियमन 2025 ला मंजुरी दिली आहे. या नियमानुसार, सुमारे 11 वर्षांनंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमानुसार, पीजीनंतर 1 वर्षाची बीएड, पदवीनंतर 2 वर्षांची बीएड, बारावीनंतर 4 वर्षांची बीएड आणि एमएड पदवी अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 10 वर्षांनंतर पुन्हा एक वर्षाचा बीएड अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

Major Changes in Teacher Education Rules!

एनसीटीईने शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने एनईपी 2020 आणि ‘विकसित भारत 2047’ या उद्दिष्टांनुसार हे नवीन नियमन तयार केले आहे. एनईपी 2020 नुसार शालेय शिक्षण चार टप्प्यांत विभागले आहे – पायाभूत टप्पा, पूर्वतयारी टप्पा, मध्यम टप्पा आणि माध्यमिक टप्पा. शिक्षकांना या वेगवेगळ्या स्तरांवर तयार करण्यासाठी स्वतंत्र बीएड अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत.

याशिवाय, एनईपी अंतर्गत सर्व अभ्यासक्रम नवीन क्रेडिट फ्रेमवर्कनुसार विकसित करण्यात आले आहेत. यात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता), व्यावसायिक अभ्यासक्रम आणि नव्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. एमएड पूर्णवेळ आणि अर्धवेळ अभ्यासक्रमांच्याही संरचनेत सुधारणा केली आहे.

एनईपी लागू होण्यापूर्वी 750 महाविद्यालयांमध्ये दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम उपलब्ध होता. आता नवीन नियमानुसार, या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू करणे बंधनकारक असेल. नियमांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये बीएड अभ्यासक्रम बंद केला जाईल, यासाठी चार वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

बीएडमध्ये नवीन बदल आणि स्पेशलायझेशन:
1 वर्षाची बीएड: पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी
2 वर्षांची बीएड: तीन वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्राम पूर्ण करणाऱ्यांसाठी
4 वर्षांची एकात्मिक बीएड: बीए-बीएड, बीएस्सी-बीएड, बीकॉम-बीएड यासह नवीन अभ्यासक्रमांचा विस्तार
याशिवाय, 2025 पासून शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, योग शिक्षण आणि संस्कृत शिक्षण या चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षक होण्यासाठी हा अभ्यासक्रम अधिक प्रीमियम आणि गुणवत्तापूर्ण ठरणार आहे. बारावीनंतर शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उत्तम पर्याय ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.