लाडकी बहीण योजनेसाठी सेविकांचा नकार!!

Anganwadi Workers Refuse to Conduct Survey for Ladki Bahin Yojana!!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या मानधनाच्या रखडलेल्या रकमेवरून त्यांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत.

Anganwadi Workers Refuse to Conduct Survey for Ladki Bahin Yojana!!

राज्यातील अनेक लाभार्थ्यांचे तपासणी करून मानधन थांबवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात १,२२९ लाभार्थी बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासन त्यांच्या घरची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आली आहे.

सेविकांनी अर्ज भरण्यासाठी शासनाने त्यांना प्रत्येकी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप हा भत्ता मिळाला नसल्याने सेविकांमध्ये नाराजी आहे. योजनेचा लाभ लाभार्थींना मिळूनही सेविकांना मानधन मिळाले नाही, यामुळे त्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला व बालकल्याण विभागाने ३ फेब्रुवारीला अधिकृतपणे सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या. काटोल तालुक्यात सर्वाधिक १,२२१ बहिणींच्या नावाची नोंद झाली असून, नरखेड, कळमेश्वर, सावनेर व नागपूर ग्रामीण भागातही काही लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे सेविकांच्या मानधनासाठी निधी प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच सेविकांना मानधन मिळण्याची शक्यता आहे. मानधन मिळताच सर्वेक्षणाचे काम सुरू होईल, अशी चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.