महिलांसाठी आनंदाची बातमी; होळीच्या सणानिमित्त मोफत साडी वाटप !

Great News for Women!

रेशनकार्ड धारक महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत गरजू महिलांना होळीच्या सणानिमित्त मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ही योजना लागू राहणार असून, जालना जिल्ह्यातील 44,160 आणि पुणे जिल्ह्यातील 48,874 महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

Great News for Women!

कधी आणि कुठे मिळेल साडी?

  •  होळीपूर्वी स्वस्त धान्य दुकानांमधून साडी वाटप
  • अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांसाठी लागू
  • राज्यातील विविध जिल्ह्यांतील हजारो महिलांना लाभ मिळणार

साडी वितरणात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. लाभार्थींनी साडी घेताना ती नीट तपासावी. निकृष्ट किंवा फाटकी साडी आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी. मागील वर्षी सरकारने प्रति साडी 355 रुपये खर्च केला होता.

गरजू महिलांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार असून, त्यांना होळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी मोफत साडीची भेट मिळणार आहे. तुम्ही जर पात्र असाल, तर तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानातून साडी घेण्याची संधी दवडू नका!

Leave A Reply

Your email address will not be published.