लाडकी बहिण योजना : आता नवे नियम, आयकर खात्याची नजर!

Ladki Bahin Yojana: New Rules!

लाडकी बहिण योजनेत मोठे बदल होत आहेत. पाच लाखांहून अधिक अपात्र लाभार्थींना वगळण्यात आले असून, आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या प्रक्रियेसाठी आयकर विभागाच्या नोंदी तपासल्या जातील.

Ladki Bahin Yojana: New Rules!

महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे आर्थिक तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 30% खर्च कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी आता अधिक काटेकोर नियम लागू केले जातील.

नवीन नियम आणि बदल:

  • लाभार्थ्यांचे आयकर नोंदी तपासले जाणार
  • प्रत्येक वर्षी जून-जुलैमध्ये ई-केवायसी अनिवार्य
  • लाभार्थी हयात आहे की नाही, याची पडताळणी होणार
  • कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ₹2.5 लाख ठेवली जाणार
  • जिल्हास्तरावर फेरतपासणी करून अपात्रांना योजनेतून वगळणार

लाडकी बहिण योजनेचे वार्षिक बजेट तब्बल ₹45,000 कोटी आहे. मात्र, बोगस लाभार्थ्यांमुळे राज्याच्या तिजोरीला ₹450 कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने आता थेट आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.