खुशखबर! सिडको मध्ये विविध संवर्गातील पदांसाठी डायरेक्टच भरती सुरु, त्वरित घ्या लाभ!
CIDCO Corporation Recruitment for Various Posts!
सिडको भरती 2025: जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर हि एक आपल्या साठी मस्त संधी आहे. भारतातील अग्रणीय संस्था सिडको मध्ये मोठी संधी! सिडको महामंडळात विविध पदांसाठी भरती सिडको (CIDCO) वर्ग-अ आणि वर्ग-ब मधील रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 38 पदांची भरती केली जाणार आहे. चला तर माहिती करून घेऊया या भरती बद्दल पूर्ण माहिती आणि अपडेट्स..
पद व पात्रता:
- उपनियोजनकार (Deputy Planner) – 13 पदे (महिला – 2, दिव्यांग – 1 राखीव)
- शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनीअरिंग/आर्किटेक्चर/प्लानिंग पदवी आणि टाऊन/रिजनल/अर्बन प्लानिंगमध्ये मास्टर्स डिग्री
- वेतन: ₹56,100 – ₹1,77,500 (अंदाजे ₹1,12,000/- महिना)
कनिष्ठ नियोजनकार (Junior Planner) – 14 पदे (महिला – 3, दिव्यांग – 1 राखीव)
- शैक्षणिक पात्रता: बॅचलर ऑफ प्लानिंग किंवा समतुल्य पदवी
- वेतन: ₹41,800 – ₹1,32,300 (अंदाजे ₹78,000/- महिना)
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) (Field Officer – Architect) – 9 पदे (महिला – 3, दिव्यांग – 1 राखीव)
- शैक्षणिक पात्रता: B.Arch./G.D. Arch. आणि SAP GLOBAL सर्टिफिकेशन
- अनुभव: किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक
- वेतन: ₹41,800 – ₹1,32,300
सहयोगी नियोजनकार (Associate Planner) – 2 पदे
- शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनीअरिंग/आर्किटेक्चर/प्लानिंग पदवी आणि टाऊन/रिजनल/अर्बन प्लानिंग पदव्युत्तर पदवी
- वेतन: ₹67,700 – ₹2,08,700
वयोमर्यादा (दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी):
- खुला गट – 38 वर्षे
- मागासवर्गीय – 43 वर्षे
- दिव्यांग – 45 वर्षे
निवड प्रक्रिया:
- ऑनलाइन परीक्षा – 200 गुण, 120 मिनिटे
प्रश्नपत्रिका विभाग: - इंग्रजी – 25 प्रश्न
- सामान्य ज्ञान – 25 प्रश्न
- आकलन क्षमता (रिझनिंग) – 25 प्रश्न
- व्यावसायिक ज्ञान – 25 प्रश्न
- 90 गुणांपेक्षा जास्त मिळवणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील
- कनिष्ठ नियोजनकार निवड: 200 गुणांच्या ऑनलाइन परीक्षेवर आधारित
- वर्ग-अ पदांसाठी अंतिम निवड: ऑनलाइन परीक्षा + 25 गुणांची मुलाखत
- वास्तुशास्त्रज्ञ (Architect) पदांसाठी निवड: ऑनलाइन परीक्षा (200 गुण) + SAP प्रमाणपत्र (10 गुण) = 210 गुणांवर आधारित
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग – ₹1,180/- (GST सह)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 8 मार्च 2025
- अर्ज करण्यासाठी लिंक: https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/
अडचणीसाठी संपर्क:
1800 222 366 / 1800 103 4566
अधिकृत संकेतस्थळ: www.cidco.maharashtra.gov.in
पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी दवडू नका आणि त्वरित अर्ज करा!