Good News ; अमरावतीत येत्या जुलैपासून पायलट प्रशिक्षण सुरू !

Pilot Training to Begin in Amravati from July !

बेलोरा विमानतळावर येत्या जुलैपासून पायलट प्रशिक्षण सुरू होणार आहे. टाटा ग्रुपच्या एअर इंडियाचा हा प्रकल्प असून, येथे १८० वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी जुन्या विमानतळावर बांधकामाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

Pilot Training to Begin in Amravati from July !

बेलोरा विमानतळावरील विविध विकासकामे पूर्ण झाली असून, आता केवळ विमानांच्या ‘टेक ऑफ’ची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारने या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग सेंटरला मान्यता दिली आहे आणि त्याच्या उभारणीस गती देण्यात आली आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, संपूर्ण देशभरातील पायलट प्रशिक्षणासाठी विद्यार्थी अमरावतीला येतील. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणानेही या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.

अत्याधुनिक सुविधा
बेलोरा विमानतळाच्या जुन्या भागातील १० एकर परिसरात हे प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. यात प्रशिक्षार्थींसाठी स्वतंत्र अकॅडमी, अत्याधुनिक वसतिगृह, प्रशिक्षण कक्ष, भोजन कक्ष, तसेच सर्व आवश्यक सोयी-सुविधा असतील. पायलट ट्रेनिंगसाठी आवश्यक असणारे हँगर ट्रेनिंग सेंटर तयार केले जात आहे.

प्रवासी विमान सेवा लवकरच
बेलोरा विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात परवाना मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला अमरावती-मुंबई मार्गावर ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याची तयारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने केली आहे.

वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
गौरव उपश्याम, प्रबंधक, बेलोरा विमानतळ, यांनी सांगितले की जुलै किंवा ऑगस्टपर्यंत हा प्रकल्प सुरू होईल. बेलोरा विमानतळाचा जुना भाग या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. हँगर ट्रेनिंग, वसतिगृह, प्रशिक्षण सुविधा आदींची निर्मिती वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.