तलाठ्याच्या ११ सेवा आता ऑनलाइन उपलब्ध!

11 Services of Talathi Now Available Online!

‘ई-हक्क’ प्रणालीअंतर्गत वारस नोंदणी, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, गहाणखत करणे यांसारख्या ११ सेवा आता फक्त ऑनलाइनच मिळणार आहेत. त्यामुळे अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती सहज उपलब्ध होईल. तसेच ‘ई-हक्क’ प्रणालीची १००% अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज सक्तीचा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

11 Services of Talathi Now Available Online!

ऑफलाइन अर्ज घेण्यास बंदी

अनेक नागरिक अजूनही ‘ऑफलाइन’ अर्ज दाखल करतात. त्यामुळे त्यांची प्रक्रिया लांबणीवर पडते. जिल्हाधिकाऱ्यांनी आता अशा अर्जांना ‘ऑनलाइन’ स्वरूपात बदलून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे अनेकदा अर्ज तलाठ्याकडेच सादर केले जातात. मात्र, वेळेवर कार्यवाही होत नसल्याने नागरिक अडचणीत सापडतात.

ई-हक्क प्रणालीअंतर्गत अर्जाची स्थिती अर्जदाराला आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही सहज समजेल. त्यामुळे पारदर्शक कारभार शक्य होणार आहे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

ई-हक्क प्रणालीत उपलब्ध सेवा:

ई-करार नोंद
बोजा चढविणे/गहाणखत
बोजा कमी करणे
वारस नोंदणी
मृत व्यक्तीचे नाव कमी करणे
अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे
एकत्र कुटुंब व्यवस्थापक नोंद कमी करणे
विश्वस्त नावे बदलणे
खातेदारांची माहिती भरणे
हस्तलिखित व संगणीकृत तफावत सुधारणा
मयत व्यक्तीच्या वारसांची नोंदणी

ई-हक्क प्रणालीची सक्तीची अंमलबजावणी!

तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना यासंदर्भात स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्यात अडचण येत असल्यास, त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.