मुख्यसेविका पदभरतीसाठी सहा टप्प्यांत होणार परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू!!

ICDS 2025 Exam latest Update

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मुख्यसेविका पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, एकूण १०२ पदांसाठी तब्बल ८८,७६८ अर्ज प्राप्त झाले आहेत(ICDS 2025 Exam latest Update ). या पदांसाठीची परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ती संपूर्ण पारदर्शक पद्धतीने आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली घेतली जाणार आहे. परीक्षेचे आयोजन ७६ परीक्षा केंद्रांवर करण्यात आले असून, ही परीक्षा सहा टप्प्यांत विविध पाळ्यांमध्ये पार पडणार आहे. परीक्षेसंबंधीचे वेळापत्रक आणि उमेदवारांसाठी आवश्यक सूचना अधिकृत संकेतस्थळावर https://www.icds.gov.in प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

ICDS 2025 Exam latest Update

राज्यात सध्या केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये ५५३ बालविकास प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये ४४९ ग्रामीण, ८६ आदिवासी आणि १०४ नागरी प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांतर्गत एक लाखाहून अधिक अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, त्यामधील ५,६३९ अंगणवाडी सेविका आणि १३,२४३ महिला मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया ५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून, ही पदे ३१ मार्चपूर्वी भरली जाणार आहेत. या भरतीसाठी १२वी उत्तीर्ण ही पात्रता आवश्यक असल्याचे आयुक्त कैलास पगारे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) पदभरतीसाठी शासन धोरणानुसार एकूण १२८ रिक्त पदांपैकी ८० टक्के म्हणजेच १०२ पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टीसीएस कंपनीतर्फे पात्र उमेदवारांकडून मागील वर्षी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते आणि याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या परीक्षेचे आयोजन १४ फेब्रुवारीपासून २ मार्चदरम्यान होणार असून, परीक्षार्थींच्या सोयीसाठी त्यांना त्यांच्या जिल्ह्यात किंवा जवळच्या केंद्रावर परीक्षा देता येईल. प्रत्येक परीक्षा केंद्रावर टीसीएसतर्फे परीक्षा समन्वयक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय आयुक्तालयामार्फतही परीक्षा निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

परीक्षा प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक राहावी आणि कोणत्याही गैरप्रकारास आळा बसावा यासाठी राज्यातील ७६ परीक्षा केंद्रांवर सिग्नल जॅमर बसवण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.