इंडियन बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, ₹१,७३,८६०/- इतका पगार , त्वरित करा अर्ज !
Indian Bank Recruitment 2025
इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे! बँकेत ऑथोराइज्ड डॉक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा, कारण अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारिख २६ फेब्रुवारी २०२५. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
इंडियन बँकेत भरती २०२५ अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारिख २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे. अधिकृत वेबसाइट indianbank.in वर अर्जाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक असून संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव असावा. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे (Interview) घेतल्या जाईल आणि शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
या पदासाठी पगार ₹१,७३,८६०/- प्रति महिना (अंदाजे) राहणार आहे. अर्जाचा नमुना इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून अर्ज भरून ऑफलाइन पद्धतीने खालील पत्यावर पाठवावा: चीफ मॅनेजर, इंडियन बँक, क्षेत्रीय कार्यालय, नंबर १, शालिवाहन रोड, मैसूर-५७००१०.
तसेच , नोकरीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी news24.mahabharti.in ला रोज भेट दया.