नविन भरती प्रक्रिया! आरोग्य विभागात २० हजार पदे अद्याप रिक्त!

Arogya vibhag Bharti Positions Vacant Health Department!

छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील सरकारी रुग्णालयांमध्ये अवघ्या चार दिवसांत १६ बालकांसह ३१ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दयनीय स्थिती समोर आली (Arogya vibhag Bharti Positions Vacant Health Department!). तरीसुद्धा, राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये सुमारे २० हजार मंजूर पदे आज ही रिक्त असल्याचा धक्कादायक खुलासा बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

20,000 Positions Vacant in the Health Department!

उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या सहाय्यासाठी नेमलेल्या अ‍ॅड. मोहित खन्ना यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रतिज्ञापत्रांवर आधारित माहिती सादर केली. त्यांनी या परिस्थितीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालय आणि नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या चार दिवसांत १६ बालकांसह ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनांनंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या गंभीर प्रकरणानंतर न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.