महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे १५,००० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू
Pavitra Portal 15000 Posts Bharti 2025
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे १५,००० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे Pavitra Portal 15000 Posts Bharti 2025 . या उपक्रमासाठी तलिस्मा कॉर्पोरेट प्रा. लि. या कंपनीला ६९ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून या वर्गांची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे. जानेवारीअखेर त्या पुस्तकांची छपाई सुरु होईल. मराठी शाळांमध्ये आता ‘सीबीएसई’प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत.
नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविला जाईल, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु झाली आहे. जानेवारीअखेर जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
भरती प्रक्रियेचे टप्पे:
- जाहिरातींचे प्रकाशन: जानेवारी अखेरीस पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड केल्या जातील.
- उमेदवारांची नोंदणी: पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागेल, ज्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागेल.
- कागदपत्रे पडताळणी: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- गुणवत्ता यादी: पडताळणीनंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, ज्यात गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
- नियुक्त्या: जून २०२५ अखेरपर्यंत सर्व नियुक्त्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
महत्वाच्या सूचना:
- खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत.
- मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी शालेय शिक्षण विभागाकडून नवीन ‘एसओपी’ ठरविण्यात येत आहे, ज्यामध्ये उमेदवारांची कागदपत्रे, व्यक्तिमत्व, आणि पाठ सादरीकरण अशा बाबींवर ३० गुणांची मुलाखत होईल.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या कमी होईल आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी, कृपया पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
स्थानिक उमेदवाराला एम ए मास्टर ऑफ आर्टस् वर प्राधान्य दिले पाहिजे.
Tet pass asel tyancha bharata yenar ka