पडताळणी नंतर बाद होणार अर्ज! लाडकी बहीण नियम मध्ये महत्वाचा अपडेट २.५ लाख उत्पन्नाची मर्यादा!
Ladki Bahin Application verification
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे नियम बदलणार नाहीत. मात्र, अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची तक्रार आल्यास संबंधित नावांची पडताळणी करून अर्ज बाद केले जातील, अशी माहिती महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला ‘लाडकी बहीण – Ladki Bahin Application verification’ योजनेसाठी अपात्र असतील. तथापि, ज्यांच्या अर्जाबाबत तक्रारी येतील त्यांच्याच अर्जाची पडताळणी होईल आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या योजनेसाठी अपात्र ठरतील. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून त्यातील महिलांची संख्या कमी केली जाणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यात तथ्य नाही. अर्जाची पडताळणी केली जाणार नाही अथवा योजनेचे नियमही बदलले जाणार नाहीत.
काही महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन अर्ज केले होते. त्यातील एक अर्ज वाद होईल. काही महिलांचे लग्नानंतर राज्याबाहेर स्थलांतर झाले आहे. अशा महिला अपात्र ठरतील. चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरीदेखील ज्यांनी अर्ज केला असेल, अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. तसेच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार योजनेसाठी अपात्र ठरतील, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.